जालना: जालन्यात खळबळबळ: महर्षी दयानंद शिक्षण संस्थेवर डल्ला मारणारे 'बनावट' पदाधिकारी जेरबंद..
Jalna, Jalna | Apr 17, 2026 जालन्यात खळबळबळ: महर्षी दयानंद शिक्षण संस्थेवर डल्ला मारणारे 'बनावट' पदाधिकारी जेरबंद.. आज दिनांक 17 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना: शहरांमधील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या 'महर्षी दयानंद शिक्षण प्रसार समिती'वर बेकायदेशीरपणे कब्जा मिळवून शासनाची आणि संस्थेची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. सदर बाजार पोलिसांनी याप्रकरणी मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक केली असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले