सोनपेठ: शेळगाव हटकर शेत शिवारात आगीच्या घटनेत सहा एकर ऊस जळून खाक
सोनपेठ तालुक्यातील शेळगाव हटकर शेतशिवारात आज मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. विटा खुर्द येथील शेतकरी बबन पांडुरंग गव्हाणे यांच्या शेळगाव हटकर शेतशिवारात सर्वे क्रमांक ३६५ मधील तब्बल सहा एकर ऊस आगीत जळून खाक झाल्याची घटना आज शनिवार १ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. अचानक लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.