चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक ठरणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाला 'पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय' असे नाव देण्यास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. आज विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या रुग्णालयाला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली. या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारा