समुद्रपूर: ट्रकची दुचाकीला धडक, बापलेक गंभीर जखमी: कोल्ही शिवारातील घटना
समुद्रपूर:नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील कोल्ही शिवारात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील बापलेक गंभीर जखमी झाले.या प्रकरणी समुद्रपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार मोहगांव येथील रहिवासी सतीश मोतीराम सातपुते (५५) व त्यांचा मुलगा रूपेश सतीश सातपुते (वय २४) हे दोघे बापलेक त्यांचा नातेवाईक पंकज सातपुते याची दुचाकी एम एच ३२ एक्स २३२१ ने परत करण्यासाठी गावावरून दुचाकीने हिंगणघाटच्या दिशेने जात होते.ट्रकने धडक दिली.