समुद्रपूर: चालत्या कारने घेतला पेट:सुदैवाने कोणतीही जीवनात हानी नाही.कार जळून खाक: शेडगाव मांडगाव रस्त्यावरील घटना
समुद्रपूर तालुक्यातील वर्धा मार्गावरील शेडगाव मांडगाव रस्त्यावर चालत्या कारने अचानक पेट घेतला यामध्ये कारमध्ये बसुन असलेल्या नागरीकांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवनात हानी झाली नसली तरी कार जळून खाक झाली. प्राप्त माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील कुटुंब जाम येथे कारमध्ये सीएनजी भरपूर वर्ध्याकडे निघाले होते याच दरम्यान शेडगाव मांडगाव रस्त्यावर कारने अचानक पेट घेतला यावेळी कारमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या हि बाब लक्षात घेताच ते विना विलंब कार खाली उतरले.