पनवेल: आदिवासी नागरिकांच्या प्रश्नांवर आमदार महेश बालदी यांची आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्याशी भेट
Panvel, Raigad | Oct 15, 2025 उरण विधानसभा मतदारसंघातील आदिवासी नागरिकांना भेडसावणाऱ्या रस्ते, पाणी, वीज, घरकुल आदी मूलभूत सुविधांच्या प्रश्नांबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची आज बुधवारी दुपारी २ च्या सुमारास आमदार महेश बालदी यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.या चर्चेदरम्यान आमदार बालदी यांनी आदिवासी भागातील लोकांच्या अडचणींचा वेध घेत तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मंत्री डॉ. उईके यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.