जालना: जालन्यात विमानाच्या सलग घिरट्यांनी नागरिकांमध्ये संभ्रम;बदनापूर ते जालना परिसरात चर्चांना उधाण;नेमके कारण अद्याप अस्पष्ट
Jalna, Jalna | Jun 1, 2026 जालना जिल्ह्यातील बदनापूर आणि जालना शहर परिसरात सोमवारी आकाशात एका विमानाने वारंवार घिरट्या घातल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. विमानाने एकाच वेळी पाच ते सात वेळा फेर्या मारल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले असून हा प्रकार अनेक तासांपासून सुरू असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. सोमवार दि. 1 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मागील तिन दिवसापासून हा प्रकार सुरु असल्याचे नागरीकांनी सांगीतले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार तीन दिवसापासून दिसत आहे.