भोकरदन: केदारखेडा राजुर रोडवर वज्रेश्वर पेट्रोल पंप समोर स्पोर्ट बाईक वर स्टंट करत असताना अपघात,तरुण जागीच ठार
आज दिनांक 23 मे 2026 वार शनिवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन ता. केदारखेडा ते राजुर या मुख्य मार्गावर काल दिनांक 22 मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास स्पोर्ट बाईकवर स्टँड करत असताना केदरखेडा राजूर रोडवर असलेल्या वज्रेशवर पेट्रोल पंपाचा वर प्रफुल सुधाकर खरात वय 23 वर्षे या तरुणाच्या दुचाकीचा अपघात झाला या तरुणाच्या डोक्याला मार लागला व याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेची नोंद राजूर पोलीस ठाण्यात देण्यात आले असून पुढील पोलिस करत आहे.