रामटेक पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करीत पो.स्टे. रामटेक अंतर्गत येणाऱ्या खुमारी येथील प्रकाश कामडे वय 45 वर्षे रा. खुमारी यांनी त्याच्या शेतातील घरामध्ये महाराष्ट्र प्रतिबंधित तंबाखू विक्रीकरिता असलेला साठा जप्त केला. 24 फेब्रुवारीला रात्री नऊ वाजता ही कारवाई करण्यात आली. पूर्ण कारवाई अंती 25 फेब्रुवारीला गुन्हा नोंद करण्यात आला व दोन आरोपींपैकी प्रकाश कामडे याला अटक करण्यात आली. तर आशिष रोकडे, नागपूर याचा शोध घेतला जात असल्याची माहिती रामटेक पोलिसांनी दिली.