जालना: रावसाहेब दानवे यांच्या पराभवानंतर जालन्याच्या विकासाला ब्रेक? नागरिकांत चर्चा
Jalna, Jalna | Jun 19, 2026 माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर जालना शहराच्या विकासाचा वेग मंदावल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दानवे यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे आणि रेल्वेसंबंधी प्रकल्पांना चालना मिळाली होती. मात्र त्यानंतर अपेक्षित गतीने विकास होत नसल्याची भावना काही नागरिक व्यक्त करत आहेत. नागरिकांच्या मते, दानवे केंद्रीय मंत्री असताना जालना शहराला ड्रायपोर्ट, छत्रपती संभाजी महाराज चौपाटी परिसरातील विकासकामे, रेल्वे इंजिन प्रकल्प, जालना-भोकरदन आणि ज