चंद्रपूर शहरात सतत घडणाऱ्या वाहन व देवस्थानातील चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीनंतर आरोपीस काल दि २४ नोव्हेंबर ला रात्री ८ वाजता ताब्यात घेऊन झालेल्या तपासात विविध ठिकाणातील ८ चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून एकूण ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पथक शहरात गस्त घालीत असताना आरोपी प्रतीक उर्फ राहुल वनराज झाडे (वय ३५) रा. महाकाली कॉलरी,ह.मु. छोटा नागपूर, चंद्रपूर) यास ताब्यात घेतले.