हातकणंगले: अतिग्रे येथील घोडावत कॉलेजच्या गेट नंबर 2 जवळ असलेल्या किराणा दुकानात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील घोडावत कॉलेजच्या गेट नंबर 2 जवळ असलेल्या किराणा दुकानात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, आणि सुगंधी तंबाखू यांचा साठा आढळून आला.आळते येथील अक्षय राजेंद्र खटावकर याने आपल्या दुकानात या वस्तू विक्रीसाठी ठेवल्याची माहिती कोल्हापूर अन्न सुरक्षा अधिकारी विजय जयसिंग पाचुपते यांना मिळाली होती.सदर माहितीच्या आधारे पाचुपते यांनी खात्री करून हातकणंगले पोलिसांच्या सहकार्याने सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता धाड टाकली.