अलिबाग: नवीन पनवेलमधील रस्ते दुरुस्तीला वेग,आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार कामांना गती; अतिरीक्त आयुक्त शेटे यांची पाहणी
Alibag, Raigad | Nov 12, 2025 पनवेल : पावसाळ्यानंतर शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेता पनवेल महानगरपालिकेने रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती दिली आहे. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्वच प्रभागांमध्ये रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.