जालना: जालन्यात 38 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; आरोपींच्या शोधासाठी चार विशेष पथके रवाना
Jalna, Jalna | Jun 14, 2026 जालना शहरातील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात 38 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. रविवार दि. 14 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शेख रफिक शेख कासिम (वय 38, रा. टट्टूपुरा, जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास पंचमुखी महादेव मंदिर परिसरात एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात होता.