कल्याण येथील पॅनल क्रमांक 2 मधील मिलींद नगर परिसरातील काँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र आढाव यांच्या प्रचार कार्यलयावर मध्यरात्रीच्या सुमारास दगडफेक झाली असल्याच समोर आलं आहे. या संदर्भात सुरेंद्र आढाव यांनी 7 जानेवारी रोजी दुपारी 12च्या सुमारास माहिती दिली. तसेच या घटनेचा त्यांनी निषेध केला आहे.