पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत करदात्यांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना’ राबविण्यात येत आहे. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार 15 नोव्हेंबर पर्यंत शास्तीवरती 75 टक्के सुट देण्यात आली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. या अभय योजनेचा मालमत्ताधारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आला आहे. अभय योजनेंतर्गत आत्तापर्यंत सवलतीसह 594.10 कोटींचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.