ठाणे: पाचपाखाडी येथे गाडीवर कोसळले झाड
Thane, Thane | Sep 29, 2025 आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी रात्री 2च्या सुमारास ठाण्यातील पाचपाखडी येथील टेकडी बंगला येथे एका गाडीवर झाड कोसळले. गाडीवर झाड कोसळल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व कारवाई सुरू केली. काल सकाळपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे.