नाशिक: वंदे मातरम गीत आणि भारतीयांना प्रेरणा मिळाली: डॉ गेडाम
Nashik, Nashik | Nov 7, 2025 बंकिमचंद्र चटोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम्’ या गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला स्फुलिंग मिळाले, या गीताने भारतीयांना एकत्र आणले व त्यांना स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा दिली, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले. ‘वंदे मातरम्’ गीताच्या दीडशे वर्षानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने महात्मा नगर मैदानावर सामूहिक गायन कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आयुक्त लीना बनसोड, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपस्थित.