नाशिक: गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडल्याने रामकुंड परिसरात दुकानांमध्ये शिरले पुराचे पाणी
Nashik, Nashik | Sep 28, 2025 गंगापूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळल्याने धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरी नदीला मोठा पूर आला. इशारा पातळी ओलांडल्याने रामकुंड परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला असून दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले.