भारतीय सण आणि उत्सवांची समृद्ध परंपरा जोपासण्याच्या उद्देशाने पनवेलमधील एम.सी.सी.एच. सोसायटी मैदानावर 'पतंग महोत्सवा'चे शानदार आयोजन करण्यात आले होते. मकर संक्रांतीचे औचित्य साधून 'सोसायटी मित्र मंडळ' यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते आणि शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.