"विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे सर्वंकष प्रयत्नांचे निर्देश अकोल्यात झालेल्या जिल्हास्तरीय निपुण सुकाणू समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. जिल्ह्यातील पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाची स्थिती समाधानकारक नसल्याचे सांगत त्यांनी निपुण कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यावर भर दिला. वाचन, लेखन आणि गणितातील मूलभूत कौशल्ये विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे.