मारेगाव: दुचाकीचा भीषण अपघात; सेवानिवृत्त शिक्षकांचा मृत्यू, शहरांतील सेंट्रल बँक समोरील घटना
घरी दुचाकीने जात असताना मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने समोरील दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास वणी-मारेगाव रोडवरील सेंट्रल बँक समोर घडली. मुकुंदराव पत्रुजी राजूरकर (वय 62, रा. मारेगाव) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे