जळगाव: शेतकऱ्यांच्या हितासाठी भव्य पक्ष विरहित आक्रोश मोर्चा निघणार: पद्मालय विश्रामगृह येथे माजी खा.उन्मेष पाटील यांची माहिती
शेतकऱ्यांच्या हितासाठी बुधवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारी जळगाव शहरातून पक्ष विरहित भव्य आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे. या मोर्चात बच्चू कडू हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही '' असे प्रतिपादन माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केले. मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता पद्मालय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत त्यांनी या मोर्चाची भूमिका मांडली.