नागपूर शहर: दीक्षाभूमी परिसरात नियंत्रण कक्षाचे आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन
69 व्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या कार्यक्रमाला नागपुरात येणाऱ्या लाखो अनुयायांना आवश्यक नागरिक सुविधा पुरविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे पूर्ण प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त यांनी केले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी आलेल्या अनुयायांना नागरी सुविधांची माहिती देण्यासाठी दीक्षाभूमी परिसरात महानगरपालिकेने उभारलेल्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन डॉक्टर अभिजीत चौधरी यांच्या हस्ते फीत कापून झाले.