पाचोरा नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झाली असून प्रभाग क्र.6 मध्ये शिवसेनेची भव्य रॅली आज दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता शिवसेना युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य तथा आमदार कन्या डॉ. प्रियंका पाटील यांचे नेतृत्वात काढण्यात आली, प्रभाग क्र. ६ मधून रहेमान बिस्मिल्ला तडवी व सुमित सावंत यांची पत्नी प्रांजल सुमित सावंत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, यावेळी ढोल ताशांच्या गजरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.