तळोदा: उमरी - मोहिदा रस्त्यावर जेसीबी दुचाकीचा अपघात, दुचाकी चालक ठार; तळोदा पोलिसात गुन्ह्याची नोंद
तळोदा तालुक्यातील उमरी ते मोहिदा रस्त्यावर शुक्रवार सायंकाळी जेसीबी दुचाकी च्या भीषण अपघातात दुचाकी चालक सुरसिंग वळवी याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात रात्री प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.