वडवणी: विद्यार्थिनीला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी संस्थाचालकाच्या विरोधात वडवली पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल
Wadwani, Beed | Oct 9, 2025 मागील वर्षाच्या प्रवेशाचे पैसे भर, अन्यथा तुला हॉल तिकीट मिळणार नाही, असे म्हणत विद्यार्थिनीला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात संस्था चालक दिलीप रघुनाथ मुंडे यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.वडवणी येथील रहिवासी विद्यार्थिनीने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात वडवणी येथील समर्थ नर्सिंग कॉलेज येथे एएनएम या कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. प्रवेशावेळी संस्था चालकांकडून प्रवेश शुल्क आणि परीक्षा फीस कुठलीच लागणार नाही, असे विद्यार्थिनीला सांगण्यात आले होते.