आज सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास सुतारवाडी येथील गीताबाग कार्यालयात रायगड जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी खासदार सुनील तटकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस संबोधित केले. स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरपंचायत व नगरपरिषदेच्या निवडणुकीत राज्यात आणि रायगड जिल्ह्यातही राष्ट्रवादी-महायुती सरकारला चांगले यश मिळाले आहे. या निवडणुकीचा एकूणच आढावा घेतला असता, रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ७१ जागांवर घड्याळाचे उमेदवार विजयी होत, राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष ठरला आहे. तसेच महाड पेण येथे युती झाली. कर्जतमध्ये बहुमत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाले.