भद्रावती: नमो ऊद्यानाचा निधी पायाभूत सुविधांकडे वळवा.
शिवसेनेचे नगरपरिषद कार्यालयात निवेदन.
राज्य शासनाकडून भद्रावती पालीकेला नमो ऊद्यानासाठी एक कोटीचा निधी प्राप्त झाला आहे.शहरातील पायाभूत सुविधांचा पुरता बोजवारा ऊडाला असतांना शहरात ऊद्यानाची आवशक्यता नाही.त्यामुळे ऊद्यानासाठी आलेला निधी पायाभूत सुविधांसाठी वळता करुन शहरात रस्ता,नाल्या आदी सुविधा देण्याची मागणी शिवसेना ऊबाठा तर्फे जिल्हा कामगार सेनाप्रमुख सुयोग भोयर यांच्या नेतृत्वात नगरपरिषद कार्यालयात सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.