उत्तर सोलापूर: सात रस्ता येथे बँकेचे हप्ते न भरता ट्रकची परस्पर विक्री करणाऱ्या तिघांवर सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल
बँकेचे हप्ते न भरता ट्रकची परस्पर विक्री केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना दि.२५ ऑगस्ट २०२३ ते २९ ऑगस्ट २०२३ रोजी सात रस्ता येथे घडली.याप्रकरणी महादेव पंडित आधटराव (वय-३०,रा. वाघोली वाडी,ता.मोहोळ) यांनी सदर बझार पोलीस ठाणे फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून सद्दाम विजापूरे,इमाम शेख (रा.नई जिंदगी) व महमद फिरोज (रा.बसवकल्याण, यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.