जालना: आष्टी-कोकाटे हादगाव सर्कलमध्ये वादळाचे थैमान; द्राक्ष, केळी, ऊस व आंबा बागांचे मोठे नुकसान
Jalna, Jalna | May 24, 2026 परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघातील आष्टी आणि कोकाटे हादगाव सर्कलमध्ये शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण वादळी वार्यासह मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले. रविवार दि. 24 मे 2026 रोजी दि. १ वा. मिळालेल्या माहितीनुसार या भागात हजारो झाडे उन्मळून पडली असून द्राक्ष, केळी, ऊस आणि आंबा बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वादळामुळे अनेक शेतकर्यांचे शेडनेट,पॉलिहाऊस,सोलार पॅनलचे नुकसान झाले.