आज दिनांक 13 डिसेंबर 2025 वार शनिवार रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद ते गोपी फाटा येथे भरधाव पिकपणे दुचाकीला पाठीमागून धडक दिली आहे, सदरचा अपघात हा काल दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी झाला असून यामध्ये दुचाकी स्वार तरुण हा गंभीर जखमी झाला आहे,यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही प्रवाशांनी, शेतकऱ्यांनी सदर जखमी तरुणाला तात्काळ जाफराबाद ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून मात्र त्याचे नाव कळू शकलेले नाही.