जळगाव: जळगाव जिल्हा परिषदेची बेघरांसाठी 'हि दिवाळी नविन घरी' खास योजना - सीईओ मीनल करणवाल यांची माहिती
जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बेघर नागरिकांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीत जळगाव जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आता या योजनेला अधिक गती देण्यासाठी आणि बेघर ग्रामस्थांना दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्यांच्या नवीन घरात प्रवेश करता यावा, यासाठी 'हि दिवाळी नविन घरी' या नावाची एक अभिनव योजना सुरू केली आहे. अशी माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी गुरूवारी ८ मे रोजी सायंकाळी ७ वाजता दिली.