पनवेल: वाशीत सुदामा सोसायटीतील इमारतीचा स्लॅब कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही
Panvel, Raigad | Apr 5, 2024 वाशी सेक्टर २९ भूखंड क्रमांक ४९ सुदामा सोसायटीमधील इमारतीतील दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळल्याची घटना शुक्रवार दिनांक ५ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वा. घडली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील काही दुरुस्तीचे काम सुरू असल्याने त्याचा स्लॅब खाली पहिल्या मळाव्यावर खाली आला. स्लॅब ज्या हॉल मध्ये पडला सुदैवाने त्यावेळी कोणी हजर नसल्याने कोणी जखमी किंवा जिवित हानी झाली नाही.तीन महिन्यापूर्वी या इमारतीचे संरचना परीक्षण केले असून इमारत सुस्थितीत असल्याचा अहवाल आला होता.