सातारा: जिल्हा बँकेने सौर ऊर्जा प्रकल्प उभारून वीज बिलात 36 लाख 60 हजार रुपयांची केली बचत, राजेंद्र भिलारे, सर व्यवस्थापक
Satara, Satara | Sep 15, 2025 सातारा जिल्हा बँकेचा एक अभिनव उपक्रम राज्यभरात कौतुकाचा विषय ठरतोय, बँकेने केलेल्या सौरऊर्जा प्रकल्पातून तब्बल पावणे तीन लाख युनिट वीज निर्मिती करण्यात आली असून, विजेच्या बिलात तब्बल ३६ लाख ५० हजार रुपयांची बचत झाली आहे,हा प्रकल्प जिल्ह्यासोबत राज्यासाठीही आदर्श ठरणारा असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय,सातारा जिल्हा बँकेच्या मुख्य इमारतीवर उभारण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पामुळे, बँकेने ऊर्जासंचयाचा उत्कृष्ट नमुना सादर केला आहे.