जालना: मच्छिंद्रनाथ चिंचोलीत घरकुल वाद पेटला; 22 लाभार्थी डावलल्याचा आरोप, जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू
Jalna, Jalna | May 14, 2026 जालना जिल्ह्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे घरकुल योजनेच्या लाभार्थी निवडीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये नावे समाविष्ट असतानाही तब्बल 22 नागरिकांना घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुरुवार दि. 14 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.उपोषणाला पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष अॅड. ब्राह्मानंद चव्हाण यांनी भेट दिली.