औसा: आमदार अभिमन्यू पवार यांच्या मतदारसंघात रंगणार जुडोच्या स्पर्धा; जिल्हा क्रीडा अधिकारी कसगावडे यांची माहिती
Ausa, Latur | Oct 29, 2025 औसा- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद लातूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा मतदारसंघात जुडो खेळाच्या विभागीय स्पर्धा रंगणार असून या स्पर्धेसाठी लातूर विभागातील धाराशिव, नांदेड महानगरपालिका, नांदेड ग्रामीण, लातूर महानगरपालिका व लातूर ग्रामीण च्या मुली व मुले खेळाडूंची उपस्थिती राहणार आहे.