आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान पाचुंदा येथे नांदेड- जिल्ह्यातील माहूर तालुक्यात गुरुवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या जावांचा गळा आवळून खून करण्यात आला. शिवाय त्यांच्या अंगावरील सोनं देखील लंपास करण्यात आले. माहूर तालुक्यातील पाचोंदा शिवारात ही घटना घडली. अंतकलाबाई अशोक अडागळे ( वय ५५) आणि अनुसयाबाई साहेबराव अडागळे (वय ४५) अस मयतांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे माहूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.