जिल्ह्याला सिकलसेल मुक्त करण्याच्या उदात्त उद्देशाने येत्या १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'अरुणोदय' ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, तुमसर तालुक्यातील नागरिकांनी या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन आज दि. 18 जानेवारी रोज रविवारला दुपारी 2 वा. तुमसर पं. स.चे उपसभापती सुभाष बोरकर यांनी केले आहे.