ठाणे: वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी ढलाढ्यांसोबत संगणमत करतायत का?, मीरा-भाईंदर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे
Thane, Thane | Sep 15, 2025 काही दिवसांपूर्वी काशिमिरा येथे आरएमसी मिक्सरने एका शाळकरी मुलाला धडक दिली होती. त्या अपघातात त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मात्र यावर आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास मीरा-भाईंदर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच सिद्धेश राणे यांनी भाईंदर येथील उदाहरण दिले असून वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.