स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला उमेदवारी अर्ज परत घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. कामठी नगर परिषद साठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाच्या माघारीमुळे आता निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविण्यास उत्सुक असलेल्या दोन उमेदवारांनी आज आपला अर्ज अधिकृतपणे परत घेतला.