सैनिक कल्याण कार्यालयांसाठी लिपिक-टंकलेखक पदांची भरती सुरू आहे. यासाठी केवळ माजी सैनिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रारंभिक अर्जाची अंतिम तारीख 5 नोव्हेंबर होती; परंतु अधिक उमेदवारांना संधी मिळावी म्हणून मुदतवाढ करून 26 नोव्हेंबर रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद शरद पाथरकर यांनी पात्र माजी सैनिकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.