भारत टीबी मुक्त अभियानांतर्गत अकोला महानगरपालिकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ७,७३३ संशयितांची तपासणी करण्यात आली असून १,६२२ जणांना टीबीचा संसर्ग असल्याचे निदान झाले. शासनाने दिलेल्या १,६५० रुग्ण शोध उद्दिष्टापैकी ९५ टक्के पूर्तता झाली आहे. सध्या १३२ “नि क्षय मित्र” कार्यरत असून त्यांनी २७९ रुग्णांना दत्तक घेतले आहे. रुग्णांना मोफत उपचार व प्रतिमहिना एक हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. दहा पैकी नऊ टीबी रुग्ण पूर्णपणे बरे होत असल्याचे शहर क्षय