आज दिनांक २४ डिसेंबरला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोर्शी अमरावती महामार्गावरील तळणी फाट्याजवळ 407 मालवाहू वाहनातून अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनाला दिनांक 23 डिसेंबर रोजी साडेनऊ ते दहा वाजताच्या दरम्यान पोलीस गुन्हे शाखा प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेऊन, शेख राजिक शेख अमीर नावाच्या इसमाला अटक करून वाहनासहित सात लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास मोर्शी पोलिसांकडून सुरू आहे