अकोला जिल्ह्यात एकूण सात नगरपरिषद आहेत त्यापैकी बार्शीटाकळी एक नगरपंचायत असून तेल्हारा, अकोट बाळापुर, मुर्तीजापुर, हिवरखेड, या ठिकाणी नगरपरिषद आहेत दरम्यान पातुर ची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असल्यामुळे आता या निवडणुकीमध्ये भाजपकडून सहा उमेदवार घोषित केले असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून पाच उमेदवार यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे दरम्यान जिल्ह्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे.