गडहिंग्लज: गडहिंगलजमध्ये आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वात भाजपची शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनात पदयात्रा
शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आज सोमवार, १४ जुलै रोजी दुपारी बारा वाजता चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लजमध्ये भव्य पदयात्रा काढली. एकीकडे जिल्हाभरातून या महामार्गाला जोरदार विरोध होत असतानाही शिवाजीराव पाटील यांच्या भूमिकेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.