शिवसेनेला जोरदार धक्का अंबड तालुका अध्यक्षांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश अंबड, दि. 23 फेब्रुवारी – अंबड तालुक्यात आज राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली, जेव्हा शिवसेना (शिंदे गट) चे अंबड तालुकाध्यक्ष शैलेश कुढेकर यांनी “जय महाराष्ट्र” करत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कुढेकर यांच्यासोबत भांबेरी येथील युवा कार्यकर्ते ॲड. राहुल पाटील कणके व नितीन माने या