भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये पिसार्वे येथील तलावाच्या पुनर्जीवन आणि सुशोभीकरण, कोयनावेळ व घोट गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील तळोजा नदीवरील पुलाचे लोकार्पण, खारघर सेक्टर १९, भूखंड क्रमांक १४ येथील प्रभाग कार्यालयाचे लोकार्पण, तर खारघर सेक्टर ३६ येथील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. या आरोग्य केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना मूलभूत आरोग्यसेवा सहज उपलब्ध होणार आहेत.