शिंदखेडा: बेटावद चौफुली जवळ मोटरसायकलच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू अज्ञात चालकाविरुद्ध नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल.
नरडाणा गावाजवळील बेटावर चौफुली जवळ मोटरसायकलचा भीषण अपघात. याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस प्रशासनाने दिलेलेनुसार अधिक माहिती अशी की मोटरसायकल क्रमांक एम एच 18 ल 22 66 क्रमांकाची दुचाकी धुळ्याकडे येत असताना मागून अज्ञात गाडीने धडक दिल्याने सदर मोटरसायकल वरील वाहन चालक खाली पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. परंतु सदर वाहन चालक याची अद्याप पर्यंत ओळख पटून आलेली नाही. तरी सदर वाहन चालकाची ओळख पटलेली नसून सदर व्यक्तीची माहिती मिळाल्यास नरडाणा पोलिसांची त्वरित संपर्क साधावा.