वर्धमान नगर येथील इंडियन पेट्रोल पंपाजवळ असलेल्या सोफा फोम च्या इंडस्ट्रीजला भीषण आग लागली. या आग मध्ये तब्बल अडीच लाख रुपयांचा सोफा फोम जळून खाक झाला आहे. तसेच पहिल्या माळ्यावरून लेब्रा प्रजातीच्या कुत्र्याला जिवंत सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. आग लागण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. विशेष म्हणजे या इंडस्ट्रीज पासून हाकेच्या अंतरावरच इंडियन पेट्रोल पंप आहे.